मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आहे. जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहेत. मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दि. 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. शासनाचा कुठेतरी अभाव या मोहिमेअंतर्गत दिसून येत आहे कारण शहरातील केंद्रांवर आज विशेष मोहीम राबविल्या जात आहे. यामध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास गेली नाही. काही शाळा ह्या बंद असून यामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बिएलओ शाळेच्या बाहेर सकाळी 10.30 वाजता पासून उभे राहून आधार कार्ड इलेक्शन काढला लिंक करण्याचे काम करीत आहेत. जुने शहर हरिहर पेठ मनपा टाऊन शाळा ही बंद दिसून आली. बिएलओ आपले काम सदैव तत्पर्तने करत असतात परंतु शासनाच्या सुविधे अभावी शासनाच्या अशा विशेष मोहीम ह्या अपुरे पडताना दिसतात.