शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने ;  लाभ मिळण्याचा मार्ग झाला खडतर

अकोला

अकोला : जिल्ह्यातील ८३ हजार १४ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) लाभ मिळण्याचा मार्ग खडतर झाला होता. त्यामुळे ई-केवायसी रखडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. सदर डेडलाईनमध्ये जिल्ह्यातील २४ हजार ९७६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता सदर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापर करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८३ हजार १४ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आंधार संलग्न असल्याने त्यांच्या बँक खात्यात सात सप्टेंबरनंतर योजनेअंतर्गत देण्यात येणारी किस्त देण्यात येणार नाही, असा इशारा शासनामार्फत देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत युद्धस्तरावर ई-केवायसी ची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील जवळपास २४ हजार शेतकऱ्यांची ई-केवीयसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *