भंते अश्वजित यांचे निधन

आरोग्य

बाळापूर : भन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता 3 ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, आता 10,40  वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,भंते अश्वजित हे वृत्तरत्न सम्राट मधून आणि अन्य साप्ताहिक, मासिक मधून सातत्याने लिखाण करत होते, धम्मावर त्यांचे अनेक लेख प्रकाशित आहेत, त्यांची दोन पुस्तक प्रकाशित आहेत,1) चरथ भिक्खवे चारिकं,2)धम्म सागरातील शंखशिंपले, ही दोन्ही पुस्तक रमाई प्रकाशन, औरंगाबाद ने प्रकाशित केली होती,दुसरे पुस्तक दोन महिन्या पूर्वीच औरंगाबाद ला प्रकाशन सोहळा झाला होता, भन्ते अश्वजित यांची ओळख म्हणजे धम्म फळ्यावर लिहून समजावणे, मुलांना शाळेसारख शिकवले, संस्कार केले, प्रश्न उत्तर च्या माध्यमातून शिकवले, महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या ठिकाणी 32 गाव शहर इत्यादी ठिकाणी राहून त्यांनी कार्यशाळा घेतल्या, त्यांचा अंत्य संस्कार बुध्द भूमि शिर्ला, अकोला येथे दिनांक  12 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या स्मृती स विनम्र आदरांजली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *