“बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप

Maharashtra State

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राची शरमेनं मान खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करत विधानसभेत सांगितलं की, चार लाख कोटींचा प्रस्ताव ते घेऊन आले. २ लाख कोटींच्या प्रकल्पाला चार लाख कोटी सांगणं, हे कोणत्या सरकारला शोभणारं आहे. २ लाख कोटी आणि १ लाख रोजगार उपलब्ध करून देणार प्रकल्प गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.“रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहलं होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे,” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *