शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे दूर्लक्ष….स्वयंसेवी संस्था अनुदानापुरत्या कार्यरत
न्यु तापडीया नगर येथे होते कार्यरत
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाNयांचे दूर्लक्ष
वंâत्राटदाराकडे निम्मे बाल मजुर कार्यरत
रेल्वेचे अंगमेहनतीचे काम करण्यासाठी आदिवासी बालमजुरांना कामाला लावल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. न्यु तापडीया नगर रेल्वे गेटवर हे बाल मजुर रेल्वेच्या वंâत्राटदाराच्या हाताखाली काम करत होते.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अनेक बाल मजुर कार्यरत आहे. पण, बातमीत आम्ही तुम्हाला या बाल मजुरांचे छायाचित्रण दाखविणे टाळत आहोत. या ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या वंâत्राटी कामांवर हे बाल मजुर कार्यरत आहे. याकडे रेल्वेच्या बांधकाम विभागाचे दूर्लक्ष असून वंâत्राटदाराने देखील आदिवासी बालमजुरांना कामावर का लावले असा प्रश्न आहे. बाल मजुरांच्या प्रश्नांवर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना असे दृष्य दिसत नाही काय आणि दिसत असेल तर ते काय कारवाई करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोल्यातील बाल मजुरांच्या मदतीसाठी कार्यरत संस्था या केवळ शासकीय अनुदान घेण्यासाठी कार्यरत आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, या ठिकाणी सुरु असलेल्या कामात बाल मजुरांमध्ये दोन मुल तसेच अनेक लहान मुली कामावर ठेवल्याचे चित्र होते. तर उन्हात चांगलीच अंगमेहनत हे बाल मजुर करत होते. रेल्वे ट्रकवर कामासाठी कुठलिच सुरक्षा उपकरण विंâवा ड्रेस त्यांच्या अंगावर परिधान नव्हता. असे या व्हायरल व्हिडीओतून दिसत होते. जिल्हा प्रशासन व संबंधित विभाग याची दखल घेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.