देखभाल दूरुस्तीकडे महापालिकेचे दूर्लक्ष

अकोला


महापालिकेच्या पाण्याच्या टाक्याखाली कचरा
स्वच्छतेचा अभाव व्हॉलमनला होतो मोठा त्रास


महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे तसेच बांधकाम विभागाचे दूर्लक्षामुळे शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या खाली मोठे गवत साचले असून स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र आहे.


शहरात विविध ठिकाणी जलप्रदाय विभागाच्या टाक्या आहेत. या टाक्या च्या खाली अनेक व्हॉल असतात ते ओपन करत शहरात पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणी पाण्याची गळती असते त्यामुळे तिथे झाडे झुडपे उगवतात. पण, त्याची स्वच्छता करण्याची गरज असते. पाण्याच्या टाक्यांखाली थंडाव्यामुळे तिथे साप, विंचू याचा वावर असतो. पण, महापालिकेच्या बांधकाम विभाग व जलप्रदाय विभागाच्या दूर्लक्षामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या या अस्वच्छतेचे वेंâद्र झाले आहे. या ठिकाणी स्वच्छता होत नसल्याने अशा स्वच्छ परिसरातून व्हॉलमनला व्हॉल ओपन करत नागरीकांचा पाणी पुरवठा सतत करावा लागतो. या ठिकाणी असलेल्या गवत आणि झाडा झुडपांमुळे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाNयांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *