
देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. त्यात आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर हे आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी तसे संकेत दिले आहेत.