अकोट : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा संदर्भात शहर व ग्रामिण भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित्त १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर काळात सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे त्या अंतर्गत विविध सेवाकार्य करून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य आणि उतम आरोग्य मिळो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे, वाढदिवसा निमित्ताने विविध सेवाकार्य राबविण्या बाबत आढावा बैठकीचे आकोट येथे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला
सेवा सप्ताहाचे जिल्हा संयोजक आ. हरीश पिंपळे,आ. प्रकाश भारसाकळे, माजी आमदार बळीराम सिरस्कार,रमेशआप्पा खोबरे,तालुका अध्यक्ष
अशोकराव गावंडे तालुका अध्यक्ष,शहराध्यक्ष कनक कोटक, माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,राजू नागमते,मनीराम टाले,जि.प.सदस्य प्रकाश आतकड प्रभाकरराव मानकर,विनायक भोरे,मधुकर पाटकर,राजेश रावणकर,अनिरुध्द देशपांडे,संतोष झुणझुणवाल,योगेश नाठे, संदीप उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यावेळी मंगेश चिखले,विठ्ठल वाकोडे,दत्तू गावंडे,चेतन डोईफोडे, अविनाश उंबरकर, हरीभाऊ आवारे, अशोकराव झामरे, हरीश टावरी,विलास बोडखे, सागर बोरोडे, किशोर सरोदे,गजानन नळे,जितू जेशवानी,प्रवीण डिक्कर, गोपाल मोहोड,विक्रम ठाकूर,रवी ठाकूर,देवानंद डोबाळे, पुरुषोत्तम शिरसाट,राजेंद्र माऊलकर, विष्णू येउल, राजेश चंदन, विशाल भारसाकळे, भास्कर डोंगरे, इकबाल इनामदार,सौ दीपाली केवटी, कु मेघा मोहोड,सौ स्वाती चिखले, जयदेवराव साबळे, योगेश गोतमारे, शंतून चरपे,ओम शेंडे, यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.माजी आ. सिरस्कार आ, भारसाकळे,आ. पिंपळे, मानकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.प्रस्ताविक रमेश खोबरे व संचालन राजेश नागमते यांनी केले व आभार अशोकराव गावंडे यांनी मानलेत.