शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पसंती आधारित श्रेयांक पद्धती (सी.बी.सी.एस.) प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

अकोला

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत एक दिवसीय पसंती आधारित श्रेयांक पद्धती प्रशिक्षण कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अकोला चे सचिव श्री गोपाल खंडेलवाल हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ दिनेश सूर्यवंशी, प्राचार्य जगदीश साबू, प्राचार्य प्राचार्य किरण खंडारे,इतर महाविद्यालयांचे उपस्थित होते. यावेळी आभासी पद्धतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे महामयीम राज्यपाल भगतसिंग कोशियारी, उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी सांगितले की देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीबीसीएस अभ्यासक्रमाच्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे, तो आपण पूर्ण करावा. यावेळी मार्गदर्शन करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे दिशादर्शक आहे. यातील पसंती श्रेयांक पद्धती ही कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला पूरक शिक्षण देणारी आहे.आज आपण मूळ गुरूकुल पद्धतीवर आधारित शिक्षण पद्धती विसरलो आहोत, त्याची आठवण करून देणारे हे धोरण आहे. येणाऱ्या काळात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आमचा मानस असून तशा पद्धतीने शासन पावले उचलीत आहे. अमरावती विद्यापीठ हे सीबीसीएस अभ्यासक्रम लागू करणारे पहिले विद्यापीठ असून कोणतेही सहकार्य करण्यास महाराष्ट्र शासन शासन सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकातून पसंती आधारित श्रेयांक पद्धती या विषयावर कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,येथे हा आभासी कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा डॉ दिनेश सूर्यवंशी यांनी पसंती आधारित श्रेयांक पद्धती (सी.बी.सी.एस.) यावरील कोर्स अँड प्रोग्राम, प्रोग्राम आऊट कम, स्किल इन्हासमेंट, मॉडेल, ब्लू पॅरामीटर्स, ओपन इलेक्टिव्ह कोर्स, स्किल इनहास्मेंट, कोर्स क्रेडिट प्रणाली, स्वयंम, मुक्स, सीबीसीएस अभ्यासक्रम पैलू, मॉडूल्स अशा विविध विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. वेळोवेळी उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन केले. या सत्रांचे अध्यक्षपद प्राचार्य चारुशीला रुमाले, प्राचार्य किरण खंडारे, प्रा. अमृता शिरभाते यांनी भूषविले. यानंतर उपस्थित प्राध्यापक व मार्गदर्शक यांच्यामध्ये खुले चर्चासत्र पार पडले. ज्यामध्ये सीबीसीएस पॅटर्न संबंधी विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेचा समारोप शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या अध्यक्ष डॉ ताराताई हातवळणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्य मार्गदर्शक प्रा.दिनेश सूर्यवंशी, प्राचार्य जगदीश साबू व विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन निशा वराडे यांनी तर आभार निशिकांत देशपांडे यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील दहा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ जगदीश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. रोहन शिरसाट, डॉ शिवाजी नागरे, डॉ प्रशांत पिसोळकर, डॉ प्रसन्न पांडे, यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *