
– प्रहार जनशक्ती युवक आघाडीच्या जिल्हा महासचिवाचे निवेदन.
अकोला : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ चा काही विद्यार्थ्यांना पहिला टप्पा मिळाला असून काही विद्यार्थ्यांना पहिला टप्पा अद्यापही मिळालेला नाही. गेल्या दोन वर्षापासुन सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने शिकावे किंवा नाही अशी परिस्थिती समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत अधिकारी वरून ग्रॅन्ट आली नाही, ग्रॅन्ट आली की होऊन जाईल असे तोंडी सांगून विद्यार्थी व पालकांना कार्यालयातून धुडकावून लावताना दिसतात.
तरी लवकरात लवकर सदर प्रकरण निकाली काढून जिल्हा पातळीवर सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळून देण्याचे प्रयत्न करावे असे निवेदन प्रहार जनशक्ती युवक आघाडीचे जिल्हा महासचिव बॉबी पळसपगार यांनी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्तांना शुक्रवारी दिले. तसेच सदर प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यात आले नाही तर प्रहार स्टाईल आंदोलन छेडू अशी माहिती दिली.