
मुर्तिजापूर : रुजल प्रदिप गावंडे याने निट – २०२२ परिक्षेत ७२० पैकी ६७५ प्रथम प्रयत्नात गुण मिळवून यशाची भरारी घेतली.
रुजल हा डॉ. प्रदिप गावंडे पशुधन विकास अधिकारी अकोला व डॉ. अर्चना दळवी गावंडे वैद्यकिय अधिकारी यांचा मूलगा असून आकाश इंन्स्टीटयूट अकोला येथील विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या १२ बी. सी.बी.एस.ई.सी. बोर्ड परिक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवून जिल्हयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तो स्कूल ऑफ स्कॉलर्स चा विद्यार्थी आहे. तसेच मे २०२२ मध्ये झालेल्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY) दिल्ली आयोजित परिक्षेत अखिल भारतीय स्तरावर (AIR) ५१२ रॅन्क मिळवत नेत्रदिपक यश संपादन केले.
सुरुवातीपासूनच रुजल अभ्यासात जिद्दी स्वभावाचा आहे. प्रचंड मेहनत, चिकाटी व अभ्यासाचा सराव या त्रिसूत्रीच्या आधारे त्याने हे यश संपादन केले. दोन वर्षाच्या करोना काळात ऑनलाईन अभ्यास, आईची तब्बेत ठीक नसने या सर्व बाबीपासून लक्ष विचलीत न होवू देता नियमीत अभ्यास करून नेत्रदिपक यश संपादन केल्यामूळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.