बोरगाव मंजू स्टेट बॅंक शाखाधिकारी पांडे यांचे कार्य कौतुकास्पद! – उपायुक्त भटकर
-शेतकरी हिता सह बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध करून दिली संधी
बोरगाव मंजू :- गत काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल असताना त्यांना बँक च्या माध्यमातून आर्थिक आधार सह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपली सेवा करत अनेकांच्या कृटुंबाचा आधार सह सर्व सामान्य माणसाचे हित जोपासत सामाजिक बांधिलकीची जाणीव सह आपल्या सेवेचा ठसा उमटवून बोरगाव मंजू स्टेट बँकेच्या प्रगतीत येथील महीला शाखाधिकारी अनघा पांडे यांच्या कार्यकाळ सह कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन गावचे भुषण उपायुक्त मुंबई अनुप भटकर यांनी केले ते स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने आयोजित निरोप समारंभ सन्मान सोहळ्यात बोलत होते, येथील स्टेट बॅंक महीला शाखाधिकारी अनघा पांडे ह्या बोरगाव मंजू शाखेत रूजू झाल्या होत्या दरम्यान त्यांच्या सेवा काळात एक महीला शाखाधिकारी असुन सुद्धा त्यांच्या कामाची यशस्वी जबाबदारी संपूर्णपणे पार पाडली त्या सोबत त्यांची ग्रामिण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देत शेतकऱ्यांचा हिताच्या दृष्टीकोनातून गत तीन वर्षांच्या कालावधीत स्टेट बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी यशस्वी करुन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्तव्य बजावले,
दरम्यान विमा कवच देऊन मृत्यू नंतर दोन लक्ष रुपयांचा आधार धनादेश लाभ दिला, या सह बँकेच्या माध्यमातून तरुणांना मुद्रा लोण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तसेच सामाजिक जाणीव ठेवून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून बँक स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, या त्यांच्या सेवा काळात त्या सर्व सामान्य जनतेच्या आधारवड ठरल्या, तर त्यांची नुकतीच या शाखेतून अकोला शाखेत बदली झाली तर त्यांच्या जागेवर महिला शाखाधिकारी हर्षप्रिया बिरूवा हया रूजू झाल्या त्याचा सुद्धा या वेळी सन्मान करण्यात आला. दरम्यान या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त अनुप भटकर हे होते तर प्रमुख उपस्थिती सत्कार मुर्ति महिला शाखाधिकारी अनघा पांडे सह श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष संजय देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अध्यक्ष पत्रकार देवानंद मोहोड, भाजपा युवा सरचिटणीस पंकज वाडेवाले, शाखाधिकारी हर्षप्रिया बिरुवा, रोखपाल डीगांबर इंगळे, अंकिता शुक्ला, अक्षय धोत्रे अजय इंगळे, आदी उपस्थित होते, या सन्मान सोहळ्याचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने अध्यक्ष पत्रकार देवानंद मोहोड यांनी केले होते,