नवरात्री निमित्त अकोला आगार क्र.१च्या वतीने विशेष देवी दर्शन बसचे नियोजन.

Maharashtra State


अकोला :- २६ सप्टेंबर पासून देवीचे नवरात्र सुरु होत आहे, या काळात भाविकांना विशेष करुन माता भगिनींना देवीच्या दर्शनाची ओढ असते हि बाब लक्षात घेऊन रा. प. महामंडळा तर्फे २६सप्टेंबर पासून विशेष देवी दर्शन बस येथील जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८वा सोडण्यात येणार आहे.
हि बस अकोला जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८ वा निघून ८.३५ वा बाळापूर येथील बाळादेवी मंदिरावर पोहचेल तिथे बाळादेवीचे दर्शन झाल्यावर ९.२० वा बस निघून पातूर येथील रेणुका माता मंदीरावर १०.०५ वा. बस पोहचेल रेणुकामातेचे दर्शन घेऊन १०.५० वा बस निघून ती राजनखेड मार्गे रुद्रायणी देवी येथे ११.२० वा पोहचेल या ठिकाणी भाविक देवीचे दर्शन घेऊन आपापले डबे खाऊन १२.५० ला बस दोनद येथील आसरा माता देवीच्या दर्शना करिता निघेल,दोनद येथे आसरा मातेच दर्शन घेऊन १४.२५ वाजता बस काटेपूर्णा येथील ढगादेवी (चंडिका देवी ) दर्शनाकरिता निघेल,चंडिका देवीचे दर्शन झाल्यावर बस १५.५० वाजता निघून १६.३० वाजता अकोला जुने बस स्थानक येथे पोहचेल.
या विशेष देवी दर्शन बस मुळे भाविकांना एकाच दिवसात ५देवीमातेच दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. या संपूर्ण प्रवासाचे भाडे मोठ्यांसाठी २६०/-रुपये तर लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी १३०/-रुपये आकरण्यात येणार आहे, तरी भाविकांनी जास्तीत जास्त प्रमाणात महामंडळाच्या विशेष देवी दर्शन बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पी बी बुंदे आगार व्यवस्थापक, अकोला आगार क्र १ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *