अकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.

अकोला

–  वंचितचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अकोट  :    वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी  यांना  निवेदन सादर करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात असे म्हटले की अकोट तालुक्यात पावसाच्या आगमनापासून तर आजपर्यंत पावसाने थैमान घातला आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करूनही हाती अपयश आले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके काही प्रमाणात वाचवल्या गेली होती तीही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून सर्वच पिके हि पाण्याखाली बुडालेली आहेत. त्यामुळे अकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन अकोट तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी सरसकट पीक विमा द्यावा तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीस तालुक्यातील सर्व पात्र ठरवावे. शेतकऱ्यांना आज रोजी शासन मदतीची गरज आहे. या ओल्या दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहुन व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून अकोट तालुक्यात बऱ्याच  शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासनाने जर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना  ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वच पाकांना मदत जाहीर केली, तर या मदतीचा खुप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल व रोजच्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल. तरी आपण सदर निवेदनाची दखल घेवून तालुक्यातील सर्वच मंडळातील पिकांना सरसकट पिकविमा व शासकीय मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्याल हि अपेक्षाही वंचितच्या वतीने व्यक्त केली. निवेदन देते वेळी ता.महासचिव रोशन फुंडकर,संघटक सुरेंद्र औंईबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे,काशिराजी साबळे, दिपक बोडके, सुभाष तेलगोटे, सय्यद शरीफ राणा, दिवाकर गवई,संदिप आग्रे, मयूर सपकाळ, सदानंद तेलगोटे, विशाल तेलगोटे, विशाल आग्रे, दिनेश घोडेस्वार, समीर पठाण, सचिन सरकटे, पंजाबराव पाचपाटील, महिला अध्यक्षा सुनिताताई हिरोळे,लताताई कांबळे, मंदाताई कोल्हे अर्चना वानखडे,मीरा तायडे, ज्योती चांदेकर,गाजी पटेल, रामकृष्ण मिसाळ, मुस्ताक पटेल, अनिल गणगणे, प्रशांत अढाऊ अक्षय तेगोगोटे, अँड भूषण घनबहादूर, दिनेश सरकटे, सुनिल घनबादूर, हरिहर पळसकर, माणिक इंगळे, विनोद नांदूरकर,लखन इंगळे, विक्री तेलगोटे, नितीन वानखडे, गजानन सुरतने, प्रल्हाद काळे,जमु पटेल, रमेश तरोळे, सचिन घुगे युवराज मुरकुटे मुरली तेलगोटे , नितीन वाघ, प्रशांत मानकर, अनिल राऊत, प्रकाश राऊत, मंगेश कांबळे सागर आग्रे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *