मौजे नखेगांव येथील सततच्या पावसामुळे गरीब कुटुंबाचे घर कोसळले कीरकोळ मार आर्थिक नुकसान !

अकोला

चोहोट्टा प्रतिनिधी ( राजकुमार मुंडाले ) येथून जवळ च मौजे नखेगांव येथील गरीब कुटुंबाचे सततच्या पावसामुळे घर कोसळले आर्थिक नुकसान झाले . सविस्तर वृत्त असे की , श्री मधुकर मोरोदे रा नखेगांव प.सं अकोट यांचे सततच्या पावसामुळे अचानक च घर पडले परंतु कीरकोळ मार लागला असुन सुदैवाने कुठलही जीवीत हानी नाही . परंतु घरामध्ये असलेल्या जिवन आवश्यक वस्तुचे खुप प्रमाणांत नुकसान झाले . संबंधीत माहीती ही ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले व ग्रामपंचायत मार्फत पंचनामा करून संबंधीत अधिकारी यांना माहीती दीली आहे . उपस्थित म्हणून सरपंच सौ माधुरी बघे , ज्ञानेश्वर मोडक सदस्य शिवशंकर मोडक सदस्य , ग्राम . सचिव निमकाडे साहेब , मधुकर मोरोदे , प्रवीण मुंडाले . पंकज रामचौरे व इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *