रद्दी समजून कागदाचा तुकडा कचऱ्याच्या डब्यात फेकणार होती मला. मात्र, तितक्यात तिचे नशीब पालटले अन् एका क्षणात ती करोडपती बनली आहे. ही काही एखाद्या चित्रपटातील कथा नाही तर खरंच ही घटना एका महिलेच्या आयुष्यात खरीखुरी घडली आहे. आज जाणून घेऊया नक्की या महिलेबाबत काय घडलं होतंअमेरिकेत राहणाऱ्या मिसौरी येथे राहणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. तिथे Missouri Lotteryचे एक तिकिट खरेदी केले होते. जवळपास चार हजार रुपये याची किंमत होती. मात्र, तिकीट खरेदी केल्यानंतर तिने न तपासता तसंच कारमध्ये ठेवून दिलं होतं. त्याच कालावधीत लॉटरी विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. तरीदेखील तिने तिचे तिकीट तपासून पाहिलं नाही.कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या परिसरात रांगेत उभी असताना तिने कारमध्ये पडलेले लॉटरीचे तिकीट पाहिले व ते कचऱ्याच्या डब्ब्यात फेकण्यासाठी बाहेर काढले. मात्र, तिकीट फेकण्याच्या तिने तपासलं असताना तिला मोठा धक्का बसला. या महिलेने हे तिकीट स्कॅन करताच तिला मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. ती या लॉटरीची विजेता होती. काही मिनिटांपूर्वी जे लॉटरीचे तिकीट ती कचऱ्याच्या डब्ब्यात फेकणार होती आज त्यामुळंच तिचं नशीब फळफळलं होतं