मसाज करणे ही आपली परंपराच मानली आहे. डोक्याला तेल लावल्याने होणारे फायदे, शरीराला तेल लावल्याने होणारे फायदे, तेल मालिश या सगळ्यांबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं आणि वाचलं असेल. अशा स्थितीत ते शरीराला किती फायदेशीर ठरतात हेही तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की, रात्री झोपताना जर तुम्ही नाभीमध्ये फक्त दोन थेंब तेल टाकण्याचे खूप फायदे आहेत. नाभीचा आणि आपल्या सौदर्यांचा खूप जवळचा संबंध आहे. तेला प्रमाणेच इतर गोष्टींचा वापर करुन देखील तुम्ही तुमच्या सौदर्यात अजूनच भर टाकू शकता. नाभीला सुंदर बनवण्यासाठी बेसन गुणकारी आहे. बेसन वापरण्यासाठी बेसनामध्ये मोहरीचे तेल आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट नाभीवर अर्धा तास ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. काही दिवसातच तुमच्या नाभीतील काळेपणा निघून जाईल. त्याच प्रमाण तुमच्या तेजात वाढ होण्यास मदत होईल.