दिव्यांग बांधवांना गरजू साहित्य वाटप कार्यक्रम सपन्न

अकोला
  • शिवसेनेचा भव्यदिव्य उपक्रम
  • शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते साहीत्य वाटप

वाडेगाव: बाळापूर व पातूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या वतीने मोफत गरजू साहित्याचे वाटप कार्यक्रम मोठया थाटामाटात पार पडला आहे. शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते वाडेगाव येथे रविवारी दुपारी एक वाजता ते ३ वाजे पर्यंत साहित्य वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे योग्य साधने उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनेकदा दुखापती होतात. ही बाब लक्षात घेता बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून बाळापुर व पातुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गरजू साहित्य वाटपाचा संकल्प करून उपक्रम आयोजित केला.यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व आमदार नितिन देशमुख यांनी अपंगांच्या जवळ जावुन त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या व त्यांना साहीत्याचे वाटप केले.यामध्ये १८ सप्टेबर रोजी चालता- फिरता न येणाऱ्या दिव्यांगांना ई-बाइक्सचे वाटप तसेच तिन चाकी सायकलींचे तथा इतर साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या व पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन आपआपले साहीत्य घेवुन गेले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन किशोर अप्पा भुसारी यांनी केले . यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधीकारी, महीला पदाधीकारी, युवा सेने चे पदाधीकारी , कार्यकर्ते ,प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार बांधव इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

  • कुणाचीही नजर लागेल असा हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने संपन्न होत आहे याचा मला आभिमान आहे हा कार्यक्रम कुण्या एका धर्माच्या किंवा जातीच्या नागरीकांकरीता नसुन सर्व धर्मातील तळागाळातील वंचीत असलेल्या दिव्यांग नागरीकांकरीता आहे. असेच कार्यक्रम आमदार नितीन देशमुख पुन्हा पुन्हा घेतील व घराघरातील दिव्यांग नागरीकांना साहित्याचे वाटप करतील कोणताही दिव्यांग साहीत्या पासुन वंचीत राहणार नाही अशी ग्वाही देतो.
    शिवसेना नेते तथा खासदार माजी केन्द्रीय मंत्री अरविंद सावंत.
  • मी बाळापुर विधानसभा मतदार संघात विविध शासकीय योजना राबवित असतांना मी अनेक दिव्यांग नागरीकांसोबत संवाद साधला असता त्याच्याकडे दिव्यांग साहित्य उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या तेव्हा माझ्या मनाला त्याचा धक्का बसला त्यावरून मी दिव्यांग नागरीकांना साहीत्य वाटप करण्याचा संकल्प केला व शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करून नोंदणी कॅम्प ठेवुन नोंदणी करून घेतली व आजरोजी त्या नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांना साहीत्याचे वाटप करण्यात आले तसेच यापुढेही लवकरच डिसेम्बर ते जाणेवारी महीन्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी कॅम्प घेरुन पुन्हा साहीत्य वाटपाचे कार्यक्रम घेऊ असा मी शब्द देतो.
    नितिन देशमुख
    शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाळापर विधानसभा आमदार चार ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत शेकडो कार्यकर्ते सह जाहीर प्रवेश
    शिवसेना नेते तथा खासदार माजी केन्द्रीय मंत्री अरविंद सावंत. यांच्या उपस्थीत ,विधानसभा आमदार बाळापूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख
    नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाडेगांव येथील चार ग्राम पंचायत सदस्य या मध्ये कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपसभापती पं .स. बाळापूर , तथा ग्राम पंचायत सदस्य अय्याज साहील शेख फिरोज , माजी बाळापूर तालुका अध्यक्ष सांकृतीक सेल तथा युथ कॉग्रेस चे डॉ . शेख चांद, ग्राम पंचायत सदस्य शेख सलीम शेख रहुल्ला, ग्रा.पं सदस्य खैरुनिसा शेख, ग्रा प सदस्य कृ. शितल सदानंद मानकर या सर्वांनी शेकडो कार्यकर्ते सह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *