अकोला जिल्हा मधील मुर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा गावातील रेल्वे स्थानक वर रेल्वेचा थांबा देण्यात यावा या मागणी साठी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना मंदुरा गावच्या सरपंचा च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या गावाला रेल्वे स्थानकाचा थांबा होता मात्र आता मागील दोन वर्षांपासून कोविड- १९ चा प्रादुर्भाव मुळे या गावा चा रेल्वे स्टेशन येथे थाबा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे शैक्षणिक विद्यार्थी यांना ये जा करण्यास मोठा प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे या गावाचा गणपती गाणी थांबा देण्यात यावा या मागणीचे निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अतुल तेलमोरे यांच्या नेतृत्वात या गावातील सरपंच, व समस्थ चार ते पाच गावातील ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले