अडगाव बु : ग्राम पंचायत अडगाव बु च्या हद्दीतील ग्राम पंचायत मालकीच्या भाड्याने दिलेल्या खोल्यांचे थकीत असलेले ऐंशी हजार रुपये भाडे येत्या पंधरा दिवसांत वसुल करा अन्यथा ग्राम सचिवालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे जिल्हा संघटक अब्दुल शरीफ यांनी दिला आहे…..अडगाव बु ग्राम पंचायत च्या बर्याच खोल्या पदाधिकारी यांनी आपल्याच मर्जीतील लोकांना भाड्याने दिल्याचा आरोप करीत त्यातील बरेच भाडेकरू कडे मोठ्या प्रमाणात भाडे थकीत असून त्याची ग्राम पंचायत ने येत्या पंधरा दिवसांत वसुली करावी अन्यथा त्यांच्या खोल्या खाली करून बेरोजगार युवकांना देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे आज रोजी ग्राम पंचायत ने भाड्याने दिलेल्या खोल्या मधून ऐंशी हजार रुपये खोली भाडे गेल्या कित्येक महिन्यांपासून थकीत आहे या थकीत भाड्याच्या वसुली साठी ग्राम पंचायत ने पुढाकार घेऊन येत्या पंधरा दिवसांत वसुली करावी अन्यथा दिनांक 15 ऑक्टोंबर 22 ला मी ग्राम सचिवालयासमोर आमरण उपोषणाला बसेल त्यानंतर होणारे सर्व प्रकाराला ग्राम पंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे जिल्हा संघटक अब्दुल शरीफ अब्दुल शहिद यांनी ग्राम पंचायत व वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे याप्रकरणी ग्राम पंचायत काय कार्यवाही करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे