अकोला : नवरात्रउत्सव सुरू होत आहे हिंदू धर्मात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने भावभाव भक्तीने साजरा केला जातो, असाच उत्सव बार्शी टाकळी तालुक्यातील इंद्रायणी देवी इथे देवी संस्थानावर साजरा केला जातो देवीचे प्रसिद्ध व जागरूक ठिकाण असल्याने हजारो भाविका भक्तदर्शनाकरिता दररोज ये जा करतात तसेच सदर रस्ता हा विविध गावांना जोडणारा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर सतत रहदारी सुरू असते. या गावाच्या रस्त्याची दुर्दशा अत्यंत खराब झाल्यामुळे नेहमीच अपघात होत आहेत सादर रस्ता नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आज त्वरित डाबरीकरण करून दुरुस्त करावा कारण रस्त्याच्या जागोजागी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. बरेच जागी रस्ता खरडल्या गेल्या आहे रस्त्याची अवस्था अत्यंत दैनंदिन आहे त्यामुळे रस्ता दुरुस्त होणे आवश्यक आहे याआधी गावातील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना बरेच निवेदन दिलेले आहे परंतु याकडे सतत दुर्लक्ष केल्या जात आहे तरी दोन दिवसात हा रस्ता दुरुस्त व्हावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून आंदोलन करण्यात येईल त्यांची अशी जबाबदारी प्रशासनाला राहील. असा इशारा मातोश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे योगेश ढोरे, एडवोकेट ममता ताई तिवारी, उदय घोगरे, पंकज बाजोड, कुशल जैन, हरीश बोंडे, यांनी केले आहे