सरपंच पदी राजू नारायण धुंदे विक्रमी विजय.
अकोट : रामापुर .अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामपंचायत धा. रामापूर येथील घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रस्थापितांना मात देत एकतर्फी विजय खेचून आणला.
दरम्यान ग्रामपंचायत मधील सरपंच पदासह सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली . यामध्ये राजू नारायण धुंदे 1189 मते घेऊन व 777 मताचा लीड घेउन सरपंच म्हणून निवडून आले आहे. त्यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
तर वॉर्ड नंबर1. सुकळी मधून निलेश रामदास चवाळे (अविरोध), जोस्नाताई सतिष पटाळे(अविरोध) तर सोनिया बाबुलाल मावस्कर 534मते घेउन विजयी झाले आहेत. वॉर्ड नंबर 2 राहनापुर मधुन, सोनिया बाबुलाल मावसकर, गौतम रामदास वारे, संजय चुनीलाल मावसकर हे विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे सोनिया मावसकर ही वॉर्ड नंबर एक, वॉर्ड नंबर दोन मध्ये व दोन्ही ठिकाणी विजयी झालेली आहे.
वार्ड नंबर 3 शहानुर मलकापूर. मधून वृषाली अनिल टेकाम (अविरोध) तर शाहुल मंगल दारशिंम्बे विजयी झाले.
वार्ड नंबर 4 रामापुर . मधून सौ.अंकिता प्रल्हाद चामलाटे (अविरोध) अमोल दयाराम मडावी (अविरोध), संजय रामराव गेबड (अविरोध) रुपाली अनील टेकाम (अवीरोध )हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
या निवडणुकीतील विजयश्री खीचण्याकरता पॅनल प्रमुख श्री गजानन गावंडे , पत्रकार विठ्ठल येवोकार, अजय तीवाने .गंगाधर गावंडे, संदीप मासोदकर, विठ्ठल चवाळे, महादेव मासोदकर, जगन्नाथ चवाळे , सुधाकर मुंयांडे,साहेबराव मासोदकर, किशोर मते, गणेश वानखडे, प्रवीण आवटे, रवींद्र घोरड ,सुधीर भिल ,अनंत घोरड , मा.पीएस आय रामभाऊ भास्कर. शुभम गावंडे, वीनोद बाळकृष्ण चामलाटे ठाकरे , जावेद भाई. छोटेलाल पाटील धांडे, मंगल दारशिंबे, दीपक सरपे, विनायक धुंदे, किसनराव चवाळे, अन्सार मामू, युवराज धुंदे, सिद्धार्थ धुंदे, भरत गायगोले, युवराज ढोक ई मंडळींनी अथक परिश्रम घेतले.