राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय घमासान सुरू झालं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचं समर्थन करणं योग्य नाही असं म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी […]

Continue Reading

‘राज्यपाल हटाओ… महाराष्ट्र बचाओ’

राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतिसंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात असताना. आज (शनिवार) पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल हाटाओ… महाराष्ट्र बचाओ, असं आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील उपस्थित […]

Continue Reading

कोश्यारींच्या ‘या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाला पदावरून दूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असताना भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे.“मुंबईमध्ये राहणारा […]

Continue Reading

मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे – एकनाथ शिंदे

गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी […]

Continue Reading

महिन्याभरानंतरही खातेवाटप नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला शनिवारी एक महिना पूर्ण होत असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही. परिणामी मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री असाच कारभार सध्या सुरू आहे. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दोनच मंत्र्यांचे सरकार ६६ दिवस कार्यरत होते. शिंदे हा विक्रम मोडतात का, याचीच उत्सुकता असेल. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे साचेबद्ध […]

Continue Reading

गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही ….

बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एका […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल

मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ७ जुलैला मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये शासकीय कार्यालयात […]

Continue Reading

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी (२७ जुलै) राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचीही घोषणा केली. राज्यात वीज वितरण […]

Continue Reading

“तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काँग्रेसचे […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंकडून पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाही….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केलं. यात त्यांनी त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला, मात्र पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख टाळला. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत बंडखोर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी मी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर काहीही बोलू […]

Continue Reading