“देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट,” नितेश राणेंकडून उल्लेख; पोलिसांनाही भरला दम, म्हणाले “तोपर्यंत आम्ही…”

श्रीरामपूर येथील एक तरुण मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुलीशी लग्न केल्याने त्याचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसही त्याचा शोध घेत असून, अद्यापही तो सापडला नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर पोलीस आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होते. त्यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, […]

Continue Reading

शिंदे गटाचा एक आमदार होणार कमी? सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे आमदारकी धोक्यात!

जळगाव, 10 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. एक एक करून 40 आमदार शिंदे गटात दाखल झाले आहे. अजूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. अशातच जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले […]

Continue Reading

श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीने लोकहिताची अनेक कामे केली– अॅड. गजानन पुंडकर

दिनांक 11 सप्टेंबर २०२२ रोजी विदर्भातील सर्वात मोठ्या व सर्वदूर नावलौकिक असलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची अमरावती येथे निवडणूक होत आहे. यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत असून शिवाजी शिक्षण संस्थेचे किमान ८०० आजीवन सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रगती पॅनलचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीने २०१७ ते २०२२ […]

Continue Reading

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, PM Kisan योजनेच्या धर्तीवर आणणार मुख्यमंत्री किसान योजना, शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये!

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेणार आहे. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवर लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना (Chief Minister Kisan Yojana) आणणार, असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना लागू […]

Continue Reading

शिवाजी संस्थेची कार्यकारी परिषद निवडणूक जाहीर

अकोला : दिनांक 11 सप्टेंबर ला विदर्भातील सर्वात मोठी नावलौकिक असलेली शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचे निवडणुका पार पडत आहेत यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत आहे शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्ण विदर्भामध्ये विस्तृत असलेल्या हायस्कूल महाविद्यालय येथील निगडित असलेले संस्थेचे आजीवन सभासद यांची संख्या 800 च्या जवळपास आहे त्याच सभासदांना संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा […]

Continue Reading

मतभेद विसरुन दोन्ही नेते आले एकत्र

करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. […]

Continue Reading

“कुणाचं बटण कसं दाबायचं हे…”, अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती हा गड मानला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जाऊन भाजपा २०२४मध्ये बारामती जिंकणार, असा […]

Continue Reading

८ राज्य, १०० गाड्या, ५३ ठिकाणं… आयकर विभागाच्या छाप्यांनी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

नवी दिल्ली: देशभरात आज आयकर विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, छत्तीसगड, उत्तराखंड, बंगळुरुमधील आयटी पथकांनी अनेक बड्या उद्योग समूहांवर छापे टाकले आहेत. करचोरी आणि राजकीय फंडिंगमुळे हे व्यावसायिक आयटीच्या रडारवर होते. त्यानंतर बुधवारी सकाळी या टीमने वेगवेगळ्या राज्यांमध्ये ५३ ठिकाणी छापे टाकले. छाप्यात आयकर विभागाने तब्बल १०० वाहनं […]

Continue Reading

राज्यातील तब्बल १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून निवडणूक आयोगाकडून १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १८ जिल्ह्यातील या ग्रामपंचातींसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. मदान यांनी सांगितलं की, संबंधित […]

Continue Reading

मुंबई, ठाण्याच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात संध्याकाळी ५ वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. […]

Continue Reading