हिवरखेड ग्रामपंचायतीचे झाले तरी काय
हिवरखेड ग्रामपंचायतीची झाली नगर परिषद
ग्रामस्थांच्या मागणी सरकारने केली पुर्ण
अकोला,13
जिल्ह्यातील हिवरखेड या ग्रामपंचायतीचे आता नगर पंचायती मध्ये रुपांतर झाले आहे. यामुळे आता गावातील विकास कामांचे स्वरुप बदलणार आहे. त्याच बरोबर लवकरच नगर पंचायतीचे निवडणूक देखील येथे लागू शकते. या विषयी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नगर विकास विभागाने सकारात्मक उत्तर दिले होते. त्याची पुर्तता आज झाल्याची माहिती मिळाली आहे.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड या ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे याविषयीचे पत्र आज काढण्यात आले. तशी सुचना राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने हिवरखेड ग्रामपंचायतीचे रुपांतर हे नगर पंचायतीत केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांची ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता नगर पंचायत निर्माण झाल्याने नव्याने येथे विकास कामे, निवडणूका आणि इतर गोष्टींचा मार्ग हळूहळू निर्माण होणार आहे. त्याच बरोबर या नगर पंचायतीमध्ये कुठल्या भागाचा समावेश झाला याचा खुलासा देखील लवकरच होईल अशी माहिती मिळाली आहे.