गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना 10 जून रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण झाली. सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात झाला. सुंदर यांनी आयआयटी खड्गपूर येथून बीटेक आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमएसचे शिक्षण घेतले. सुंदर हे आजही आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर चालतात. त्यांच्याकडे पाहून वाटते प्रत्येक मुलाने जर आपल्या आई वडिलांचे चांगले संस्कार फॉलो केले तर प्रत्येक जण सुंदर यांच्यासारखा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

ज्या प्रकारचे रूटीन आपले आई-वडिल आपल्याला शिकवू इच्छितात अगदी तसंच रूटीन सुंदर पिचाई विदेशात सुद्धा फॉलो करत आहेत. त्यांचे मॉर्निंग रुटीन समजून घेऊन एक पालक म्हणून तुम्हाला देखील आनंद होईल. कारण आपल्या मुलाने सुद्धा हे रूटीन फॉलो करावे असे तुम्हाला देखील वाटेल. हे रूटीन केवळ आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भागच नाही तर एका हेल्दी आणि आनंददायी जीवनाचा पाया आहे. गावाकडच्या ठिकाणी आजही असे रूटीन फॉलो केले जाते आणि म्हणूनच ते एक उत्तम आयुष्य जगतात.

एका मुलाखतीमध्ये सुंदर म्हणाले कि मला लहानपणापासूनच आई वडिलांनी लवकर उठण्याची सवय लावली होती. आम्ही कधीच अंथरुणात जास्त वेळ लोळत पडलेले नसायचो. लवकर उठण्याचे फायदे आमच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवले गेले आणि मग ती सवयच मला लागली आणि आजही ती सवय तशीच आहे. मला सकळी लवकर जाग यते आणि माझा दिवस लवकर सुरु होतो.” सुंदर पिचाई रोज 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान उठतात.

उठल्यानंतर त्यांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. हातात सकाळी पेपर हा हवाच. प्रय्त्येक भारतीय घरात आपल्याला हेच चित्र दिसतं. घरातील वडीलधारी मंडळी सकाळी उठल्यावर स्नान वगैरे करून मग पहिला पेपर हातात घेतात आणि सोबतीला चहा व नाश्ता असतोच. सुंदर पिचाई यांच्या घरी सुद्धा त्यांचे वडील हेच रूटीन फॉलो करायचे. घरी रोज वर्तमानपत्र येत असल्याने वाचनाची आवड लागते. अनेक नवनवीन गोष्टी कळतात. पण जगाशी कनेक्टेड राहतो. त्यामुळे रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे.

कोणत्याही भारतीय व्यक्तीला सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन पहिला चहा हवाच, अनेकजण बेड टी देखील घेतात. एकंदर चहा हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे पेय आहे. सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की चहा प्यायल्या शिवाय त्यांचा दिवसच सुरु होत नाही. चहा प्यायल्यावरच फ्रेश वाटते आणि मगच कामाला सुरुवात होते. शिवाय चहासोबत भारतीय पद्धतीचा नाश्ता देखील करतात. सकाळचा नाश्ता हा हेवी आणि भरपेट करावा असे त्यांना लहानपणापासून शिकवले गेले आहे आणि त्यामुळे त्याची सवय आजही कायम आहे.