हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेप यांचा मानहानिचा खटला सोशल मीडियावर चांगलाच गाजला. बरेच खासगी आरोप प्रत्यारो आणि पोलखोल यामुळे हा खटला जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. अर्थात या खटल्यात अँबर हर्डचा हार झाली आणि जॉनी डेपनं हा खटला जिंकला. त्यानंतर अँबरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. ज्यावर नुकतंच एका मुलाखतीत अँबरनं प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अँबर हर्डने तिला सोशल मीडिया केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर आणि मीम्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
अँबर म्हणाली, “सोशल मीडिया युजर्स कोणताही निर्णय कसं काय घेऊ शकतात.ते अशाप्रकारच्या निर्णयापर्यंत कसे काय पोहोचू शकतात. मी त्यांना दोष देत नाहीये. मी समजू शकते की जॉनी एक प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यामुळे लोकांना वाटतं की ते त्याला ओळखतात. पण तो एक उत्तम अभिनेता आहे.”अँबर पुढे म्हणाली, “मला नाही वाटत की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे तुम्ही मला सांगू शकता. जर तुम्हाला मी चुकीची वाटत असेन तर माझ्या डोळ्यात पाहून आत्मविश्वासाने मला कोणी हे नाही सांगू शकत की सोशल मीडियावर निष्पक्ष प्रतिनिधित्व केलं जातं. माझ्या बद्दल कोण काय बोलतं याने मला काहीही फरक पडत नाही.”सध्या अँबर हर्डची ही प्रतिक्रिया बरीच चर्चेत आहे. अँबर आणि जॉनी यांचा हा खटला लाइव्ह स्ट्रीम करण्यात आला होता आणि त्यामुळे अँबरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं होतं.
दरम्यान अँबर हर्ड आणि जॉनी डेप यांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१७ साली दोघांनी घटस्फोट घेतला. २०१८ साली अँबरनं एक आर्टिकल लिहून जॉनी डेपवर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप केला होता. ज्यानंतर जॉनी डेपनं तिच्या विरोधात ५० मिलियन डॉलरचा मानहानिचा खटला दाखल केला होता. १ जून २०२२ ला न्यायालयानं या खटल्याचा निकाल जॉनी डेपच्या बाजूने दिला. यानुसार अँबरनं जॉनी डेपला नुकसान भरपाई म्हणून १० मिलियन डॉलर द्यावेत असा आदेश न्यायालयानं दिला होता.