तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर

ताज्या घड्यामोडी

नॉटिंगहम : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी भारताने चार मोठे धक्के दिले आहेत.


भारताच्या संघात यावेळी तीन मोठे बदल रोहित शर्माने केले आहे. या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक आणि युजवेंद्र चहल यांना संघाबाहेर केले आहे, तर त्यांच्या जागी अवेश खान. उमरान मलिक, श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी संघ निवडणे ही कर्णधार रोहित शर्मासाठी तारेवरची कसरत होती. कारण दुसऱ्या सामन्यात तीन खेळाडूंना संघात स्थान देताना इशान किशन आणि दीपक हुडा सारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना त्याने संघाबाहेर केले होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले होते.भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघात मोठे बदल केले होते. कारण या सामन्यासाठी विराट कोहली. रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात विराटला संधी देऊनही तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. भारताने दीपक हुडासारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला संघाबाहेर करत कोहलीला संघात स्थान दिले होते. पण कोहली यावेळी अपयशी ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा दीपकला संघात स्थान द्यायचे का, हा विचार भारतीय संघ करत होता. पण दीपकला जर संघात स्थान द्यायचे असेल तर कोणत्या खेळाडूला संघाबाहेर करायचे, हा मोठा निर्णय़ भारतीय संघाला घ्यावा लागणार होता. कारण कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूला फक्त एका सामन्यावरून संघाबाहेर केले जाऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी संघाबाहेर नेमके कोणाला करायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे होते.
दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने संघात पृनरागमन करत दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम राहील. त्याचबरोबर रिषत्र पंत हा सलामीला आला होता आणि सर्वांनाच धक्का बसला होता. पंतला संघात स्थान देण्यासाठी इशान किशनला संघाबाहेर केले होते. त्यामुळे या सामन्यात इशानला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
गोलंदाजीमध्ये पाहिले तर दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण हर्षल पटेलला मात्र चांगली कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघ हर्षलला सातत्याने संधी देत आहे, पण त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी हर्षलला वगळले जाईल, असे संकत भारतीय संघातून मिळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *