इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
पतीपासून वेगळं राहत असताना पत्नीने मंगळसूत्र न घालणे म्हणजे क्रुरता आहे, असं निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांनी घटस्पोटासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी विभक्त होताना पत्नीने मंगळसूत्र काढून ठेवले होते, असे मान्य केले. यावरूनच न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत घटस्पोट मंजूर केला
”विभक्त होताना मंगळसूत्र काढून ठेवले होते, हे पत्नीने मान्य केले आहे. कोणतीही हिंदू विवाहित स्त्री तिच्या पतीच्या हयातीत मंगळसूत्र काढत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र ही एक पवित्र वस्तू आहे. ते विवाहाचे प्रतिक आहे. त्यामुळे पत्नीने मंगळसूत्र न घालणे, ही क्रूरता आहे. अशा प्रकाराने पुरुषांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात”, असे न्यायालयाने म्हटले आहे.