अमराठी व्यावसायिकाचे हजारो ग्राहकांच्या जीवाशी खेळ – ग्राहकाचा दावा
उघड्या नालीवर खाद्यप्रेमींना आजाराचे गिफ्ट,
एम आय डी सी पॅâक्टरीतील गोरखधंदा
शिंदे सरकार एफडीए च्या भ्रष्ट अधिकाNयांवर कारवाई करा
अकोला,१६ जुलै
अमराठी व्यावसायिकाकडून तुम्ही मोठ्या आवडीने विकत घेत असलेले आणि चवीने पोटात टाकणारे शिळे समोसे खात आहात. एमआयडीसी पॅâक्टरीत हे समोसे डिप प्रिâजमध्ये एक ते दोन दिवस ठेवल्यानंतर तुम्ही नाली समोरच्या दूकानातून मोठ्या चवीने ते खाता. या दूकानावर ठोस कारवाई करण्याचे व हे दूकान सील करण्याचे धाडस एफडीए च्या अधिकाNयांमध्ये नाही. कारण त्यांच्या घरच्या मुलांच्या,मुलींच्या लग्नात पुâकट वॅâटरींग व महिन्याला पाकिट,दिवाळीत मिठाईचे बॉक्स नियमित पोहचवले जात असल्याने कारवाईची शक्यता शुन्य आहे. राज्यात नव्याने आलेले शिंदे सरकारने एफडीएच्या भ्रष्ट अधिकाNयांवर कारवाईचा बडगा उगारला तरच, कारवाई ची शक्यता ग्राहकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा, रोज एकाच तेलात तळलेले समोसे हे तुमचे पॅâट व वजन वाढवत कधी हॉर्ट अॅटक आणतील हे कोणीच सांगू शकत नाही.
सकाळी ६ वाजतापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत समोसे खाणारे अकोलेकरांना हा प्रश्न कधी पडला नाही की, इतके समोसे रोज गरमा गरम कसे भेटतात. अगदी दूकानात गेलो की, गरमागरम समोसे तयारच असतात. या अमराठी व्यावसायिकाने शिळ्या समोसाचा उद्योग सुरु केला आहे. हे तुम्ही खाल्यानंतर लक्षात येईल. समोसाच्या पापुर्दा कडक लागणे, बेचव लागणे, आतील भाजी ही तुम्हाला देण्यात येणाNया ताज्या लॉल सॉस (चटणी) मुळे शिळी होती की, नाही याची कल्पनाच येत नाही. तळल्यानंतर आतील भाजी कशी काय थंडगार होती याची जाणीव ग्राहकांना होत नाही. या समोस्यांचा थेट उद्योग झाला आहे. एमआयडीसी मध्ये तयार होणारे हे समोसे अतिशय अस्वच्छ ठिकाणी तयार होत असून त्या ठिकाणी ते तयार करत डिप प्रिâज मध्ये एक ते दोन दिवस साठवले जातात. रोज ते तळण्यासाठी केवळ शहरात येतात. एमआयडीसी येथे या उद्योगाचे निरीक्षण केल्यावर येथे इतर राज्यातील कामगार असून त्यांची कुठलिही नोंद कामगार विभाग, पोलिसांकडे नाही. या ठिकाणी एफडीए च्या अधिकाNयांनी एकदा ही व्हिजिट केली नसून केवळ त्यांच्या आशिर्वादाने हा सर्व उद्योग सुरु आहे.
पोटाचे विकार वाढणारे समोसे
शिळा पदार्थ पावसाळ्यात काय कधीच खाऊ नये. यामुळे आजार बळावतात. पण, त्याकडे अनेकांचे आपसूक दूर्लक्ष होते. शिळ्या समोसा खाल्याने त्यात असलेले वाटाणे, बटाटा, धणे याचा पोटाला चांगलाच त्रास होतो. त्याच बरोबर एकाच तेलात वारंवार समोसे तळून तुम्हाला दिल्याने त्या तेलातील पोषक तत्व निघून तुमचे वजन वाढविण्यात मोलाची मदत तर करतातच त्या सोबत तुम्हाला या मुळे Nहदय विकाराचा त्रास सुरु होण्यासाठी सहाय्य करतात. त्यामुळे अशा प्रकारे एकाच तेलात सतत तळलेले समोसे हे न खाणे हे योग्य असा वैद्यकिय सल्ला आहे.
एम आय डी सी तील समोसा उद्योग
अकोल्यातील या अमराठी व्यावसायिकाने सुरु केलेल्या या खाद्य उद्योगातील अस्वच्छतेची पाहणी करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी एफडीए, महापालिका आरोग्य विभाग यांनी संयुक्त धाड टाकण्याची गरज आहे. तरच शिळ्या समोसा च्या हा उद्योग बंद होईल. अन्यथा ग्राहकांच्या जीवाशी रोज खेळ होणे हे निश्चित आहे. या ठिकाणी नियुक्त केलेल्या इतर राज्यातील मजुर,कामगारांची कुठे ही नोंद नाही. त्यांचा ना पीएफ कापल्या जात ना, त्यांना नियमित पगार दिल्या जात. त्यांची नोंद ना कामगार विभागात आहे ना अकोला पोलिसांना या विषयी अवगत केले आहे.