दलीत वस्तीतील १७ लक्ष रुपयांचा रस्ता गेला चोरीला !

अकोला
  • बोरगाव मंजू येथील प्रकार
  • संबंधित अधिकाऱ्यांचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष
  • तक्रार करूनही दिड महिन्यापासून संबंधित गटविकास अधिकारी, सचिव,सरपंच यांना अभय आता झाली चौकशी सुरू

बोरगाव मंजू :- अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू येथील दलीत वस्ती भागात दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत २०२०/२१ मध्ये मंजूर झालेले १७ लाख रुपयांचे रस्ता काम न करताच परस्पर गटविकास अधिकारी, सचिव, सरपंच यांनी संगणमत करून निधी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला, या गंभीर बाबीची तक्रार दिनांक ९ मे रोजी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, अकोला यांना धनंजय देशमुख, सुबोध गवई सह ग्रामस्थांनी केली आहे,दिड महिन्यापासून संबंधित विभागाने दखल घेतली नाही हे विशेष,येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशमुख, सुबोध गवई सह ग्रामस्थांनी पालक मंत्री, अमरावती विभागीय आयुक्त, अकोला जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोरगाव मंजू येथील २०२०/२१ दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत येथील खाटीक पुरा येथे मंजूर कृती आराखडा नुसार १७ लक्ष रुपयांचे काम मंजूर झाले होते, परंतु बोरगाव मंजू येथील सचिव, सरपंच, यांनी संगणमत करून निधी हडप करून गटविकास अधिकारी अकोला, शाखा अभियंता बांधकाम, स्थापत्य अभियंता, विस्तार अधिकारी, पंचायत समिती यांची फसवणूक करीत चुकीच्या पद्धतीने मोजमाप पुस्तका तयार करून,त्यांचे देयके अदा करण्याच्यादृष्टीने बनावट खोटे देयके सादर करुन १७ लक्ष रुपये निधी हडप केली या आधी सुध्दा ग्रामस्थांनी वरिष्ठांन कडे तक्रारी केल्या आहेत परंतु कुठलेही कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्हा परिषद सभापती सम्राट डोंगरदिवे यांनी या प्रकरणी गटविकास अधिकारी अकोला यांना अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते परंतु अद्यापही अहवाल सादर केला नाही, सदर रस्ता हा ग्रामपंचायने ई निविदा काढून खाटीक पुरा येथे मंजूर करण्यात आले होते, परंतु हा रस्ता आज रोजी अस्तित्वात नाही, रस्ता चोरी गेला, निधी मात्र हडप करून अपहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाला १७ लक्ष रुपयांचा चुना लावला,व जनतेची दिशाभूल केली, वरील सर्व प्रकार गैर कायदेशीर असल्याने तात्काळ सचिव, सरपंच यांच्या विरुद्ध फोजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशमुख, सुबोध गवई सह ग्रामस्थांनी केली आहे, संबंधित सचिव व सरपंच यांनी संगणमत करून ग्रामपंचायत कार्यालयीन रेकॉर्ड शासकीय दस्ताऐवज मध्ये मनमानी पद्धतीने फेरफार करणे,त्यावर स्वाक्षरी करणे,खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून सदर दस्ताऐवज रेकार्ड मध्ये समाविष्ट करणे, शासकीय निधीचा विनियोग आर्थिक गैर व्यवहार करणे, अपहार करून शासकीय कामात अनियमितता करणे, आधी विकासाची योजना हडप केली आहे, तरी महोदय सदर प्रकरणी दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा जिल्हा परिषद कार्यालय अकोला येथे आमरण उपोषणाला करण्यात येईल तरी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या गंभीर घटनेची दखल संबंधित विभागांचे अधिकारी घेतील काय या कडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *