खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राना झटका; कृषी अधीक्षकांसोबत पंगा घेणे भोवले

Agricultural अकोला

अकोला,१८ जुलै
बियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ९ कृषी निविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करत १९ परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. तर पाटणी ट्रेडर्सचा परवाना रद्द केला आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, कृषी निविष्ठा केंद्र तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार भरारी पथक स्थापन करण्यात आले होते. कृषी निविष्ठा केंद्राच्या तपासणीमध्ये १३ कृषी निविष्ठा केंद्रात त्रुटी आढळल्याने त्यांचे २३ परवाने कायदेशीर कारवाईकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते. त्यावर कारवाई करीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी अकोला येथील पाटणी ट्रेडर्स यांचा रासायनिक खत परवाना रद्द केला. तर बार्शीटाकळी तालुक्यात मे. कळंब कृषी सेवा केंद्र यांचे व साईबाबा कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके असे प्रत्येकी तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. मुर्तिजापूर तालुक्यात मे गुरुकृपा अ‍ॅग्रो एजन्सीज बियाणे व रासायनिक खते विक्री , मे. गजानन अ‍ॅग्रो एजन्सीज यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री, तसेच मे शेतकरी कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री असे प्रत्येकी दोन या प्रमाणे असे एकूण सहा परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. बाळापूर तालुक्यात मे विदर्भ इरिगेशन यांचे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व शिव अ‍ॅग्रो एजन्सीज चे बियाणे, किटकनाशके व रासायनिक खते असे तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. तर पातुर तालुक्यात मे सोपीनाथ कृषी सेवा केंद्र यांचा बियाणे परवाना एक महिन्यासाठी निलंबित केला आहे. असे एकूण ९ विक्रेत्यांच्या २० परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एक परवाना रद्द तर १९ परवाने हे एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले.

मोठ्या रक्कमेची मागणी करणारा तो अधिकारी कोण
अकोला जिल्हा कृषी सेवा वेंâद्र संघटनेच्या अध्यक्षांनीच कांताप्पा खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असताना एका रासायनिक खत विव्रेâत्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करणारा तो अधिकारी कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी होण्याची गरज असून यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पथक नेमण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकाNयांनी या सर्व कारवाईमुळे शेतकNयांना कुठे ही त्रास झाल्यास नवा पेच निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

का झाली कारवाई…..
अकोला बियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ९ कृषी निविष्ठा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. तर १९ परवाने एक महिन्यासाठी निलंबित तर एक परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी दिेले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वीच कृषी निविष्ठा धारकांनी कांताप्पा खोत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. ९ जुलै रोजी अकोला जिल्ह्यातील कृषी सेवा वेंâद्रांनी कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कृषी अधिक्षक डॉ.कांताप्पा खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केला होता. त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीला वंâटाळून जिल्ह्यातील कृषी सेवा वेंâद्र एक दिवसासाठी बंद होते. त्या दिवशी शेतकरी चांगलाच त्रस्त झाला होता. संपुर्ण जिल्ह्यातील कृषी सेवा वेंâद्रांनी बंद पाळत जिल्हाधिकारी यांना डॉ.कांतापा खोत यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानंतर आज थेट बियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ९ कृषी निविष्ठा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. तर १९ परवाने एक महिन्यासाठी निलंबित तर एक परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी दिेले आहे. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असून या सर्व गोष्टींची राज्य शासनाने त्वरीत दखल घेत चौकशी पुर्ण होईस्तोवर कांतापा खोत यांना पदावरुन दूर करण्याची मागणी पुढे येत आहे. कारण, अशा प्रकारे कृषी विभागाच्या कारवाईने कृषी सेवा वेंâद्रांनी सेवा बंद केल्यास ऐन खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *