वर्गखोल्यांच्या अवस्थेबाबात मुख्याध्यपकांकडे उत्तर नाही
काय, मुख्यध्यपक आणी २१ लोकांना निष्काळजीपणामुळे निलंबन होईल ?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कलम २१ अ नुसार शिक्षणाचा हक्क दिला. त्यानुसार सर्वत्र सर्व शिक्षा अभियान राबवण्यात आले. त्या अभियाना अंतर्गत शाळांना अनुदाने देत इमारती, प्रशत्य वर्ग खोल्या, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय आणि बराच काही दिल्या गेले. हेतू एकच होता तो कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे. अशाच अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीचे आमच्या प्रतिनिधीने पडताळणी केली असता, खळबळ जनक सत्य समोर आले.
एवढेच नव्हे तर शाळेच्या आवारात दोन वृक्ष गेल्या अनेक दिवसांपासून पडलेले असून त्याची देखिल व्यवस्था लावण्यात आली नाही. परिसरातील प्रांगणात टोंगळ्यापर्यंत येतील एवढे गवत वाढले असून परिसरातील स्वच्छतेबाबत विचारले असता मुख्याध्यापकांना उत्तर सुचत नव्हते.आरो फिल्टर आहे पण मुले टाकिचेच पाणी पितात
हि परीस्थीती पाहुन सांगा गुरुजी कस म्हणाव : स्कुल चले हम :
वास्तविक पाहता शाळेच्या परिसरात असलेल्या सर्व वस्तूंची इमारतींची आणि मुख्य म्हणजे स्वच्छतेची प्रथम जबाबदारी ही तेथे काम करीत असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांची आहे. कारण ही वास्तू खाजगी नाही म्हणून आपण सुद्धा लक्ष द्यायचे नाही, आपला पगार येतोय ना बस अजुन काय हवं! अशी काहीशी स्थिती तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी बोलण्यातून जाणवत होती. एकीकडे मुलांना बसायला सुसज्ज वर्ग खोल्या नव्हत्या तर दुसरी कडे वर्ग खोल्यांमध्ये पशू मलमुत्राने भरलेला होता, एकीकडे मुलांना पंखे नव्हते, डेक्सबेंच नव्हते तर दुसरीकडे मुख्याध्यापकांच्या निष्काळजीचे फलीत पंखे वाकडे झालेले होते, एकीकडे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचां आटापिटा होता तर दुसरी कडे शिक्षक आणि मुख्याध्यापक आपली लठ्ठ पगाराच्या स्वप्नात दिसत होते.
ज्या शाळेची अवस्था पाहिल्यावर सामान्य माणसाच्या मानत पहिला पडणारा प्रश्न म्हणजे येवढा पगार घेऊन हे शिक्षक करतात तरी काय? आता मुख्याध्यापक, तेथील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर निष्काळजी पणासाठी काय कारवाई वरिष्ठ करतील कारन कार्यवाही झाली नाही तर शासकिय शाळांमधे असीच निष्काळजीच्या भ्रष्ठाचाराची परंपरा अविरत सुरुच राहील आणी येणारी पीढी ही निकामिच राहील ति तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे मात्र सत्य