हजारो दर्शकांनी पाहिली कावड व पालखी यात्रा
जगभरात दिसले महाकव्हरेज राजेश्वरोत्सव
सोमवारी कावड व पालखी महोत्सव मोठ्या भक्तीभावात पार पडला. या कावड महोत्सवामध्ये आरआरसी नेटवर्कच्या वतीने कावड व पालखी यात्रेचे थेट प्रसारण यु ट्युब चॅनल, केबल च्या माध्यमातून घरोघरी करण्यात आले. हजारो भाविकांपर्यंत राज राजेश्वरांचा उत्सव, विराट कावड मंडळाचे थेट प्रसारण घरपोच तसेच मोबाईलवर जगभरात पाहता आले. भाविकांची अपेक्शा पुर्ती ने आर आर सी नेवटर्कच्या महाकव्हरेजचे यश अधोरेखित होत आहे.
संपुर्ण कावड व पालखी सोहळा आरआरसीच्या प्रेक्षकांना थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आले. तसेच गांधीमार्गावर डिजीटल वॉलच्या माध्यमातून संपूर्ण सोहळा एकाच ठिकाणी दाखविण्यात आला. आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात अनेक मान्यवरांनी या उपक्रमाच्या निमित्ताने भेटी देवून चर्चा सत्रात सहभाग घेतला. कावड व पालखी महोत्सवाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. आरआरसी नेटवर्कचे संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख व संचालक पंकज देशमुख यांचे पोलिस अधीक्शकांसह इतर मान्यवरांनी विशेष कौतुक केले. यावेळी सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट ने सोमवारीच सर्व कव्हरेज प्रमुख छायाचित्रासह कव्हर केल्याबद्दल गौरवान्वित केले.
या राजेश्वरोत्सव उपक्रमाचे उद्घाटन आ. वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आला. या महाकवरेज उपक्रमामध्ये डॉ. अभयदादा पाटील, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, हरिशभाई आलिमचंदानी,
डॉ. अशोक ओळंबे, मनिष हिवराळे, झी महासेलचे सचिन अग्रवाल , ओम ज्वेलर्सचे संचालक विनोद आलिमचंदानी, आनंद रेस्टॉरंटचे संचालक आशिष अग्रवाल व शौनक अग्रवाल, शिवानी कन्ट्रक्शनचे कार्तीक निलेश देशमुख, गोपाल सुपर बाजारचे गोपाल शर्मा, प्रसिध्द कवी किशोर बळी, नगरसेवक मंगेश काळे, राजेश मिश्रा, अँड, पप्पू मोरवाल आदि मान्यवरांनी सहभाग होवून शुभेच्छा व्यक्त केल्या. पंडीत सुदर्शन शर्मा यांनी लाखोंभाविकांना कावड व पालखी यात्रेचे धार्मिक तसेच पारंपारीक महत्व विशद केले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख स्वप्नील रोम यांनी काम पाहिले. या सर्व उपक्रमात जाहिरातदार व हिंतचिंतक व पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाची मोठी मदत झाली.
तर आर आर सी नेटवर्कची तांत्रिक टिम, इंटरनेट सुविधा पुरविणारी टिम, अँकर, व्हिडीओ एडिटींग करणारी टिम, कॅमेरा पर्सनल्स, संपादकीय विभाग, वितरण व जाहिरात विभाग, तसेच आर आर सी नेटवर्क चे सर्व केबल आॅपरेटर यांनी विशेष सहकार्य करत घरोघरी हे थेट प्रसारण पोहचविण्यात मोलाची मदत केली. आर आर सी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांनी आर आर सी नेटवर्कच्या टिमचे अभिनंदन करताना भाविकांच्या अपेक्शा पुर्तीत आर आर सी यशस्वी ठरल्याचे सांगितले.