- नाल्यांची साफसफाई न झाल्याचा परिणाम
अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही. याचा फटका आता पावसाळ्यात सामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे. या परिसरात असलेल्या पोद्दार शाळेमध्ये जाण्याकरिता रस्ता सुद्धा विद्यार्थ्यांना नसल्याचे चित्र आहे.

अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरामध्ये असलेल्या पोद्दार शाळेमध्ये जाण्याकरिता सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत कोठून जावे असा प्रश्न आता पडला आहे. दरम्यान महापालिका प्रशासन इतरांना स्वच्छतेचे धडे नेहमी देत राहते परंतु शहरातील प्रत्येक भागातील नाल्यांच्या बाबतीत हि स्वच्छता का केली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थी करत आहेत.