अंडर पास पुलाचे बांधकाम झाले आणि पुन्हा पाडले

अकोला

  • भविष्यात धोका निर्माण होऊ नये याकरिता घेतला निर्णय

मुर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीरणाच्या कामाचा विवीध कंपनी ने सोडल्याने लवकरात लवकर चौपदरी रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी नव्याने सदर कामाचा ठेका राजपथ इन्फ्राकंपनीस देऊन दीलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असताना अनभोरा जवळ अंडर पास रस्ता असलेल्या पुलवर 23 सप्टेंबर रोजी स्लॅब टाकण्याचे काम पुर्ण केल्यावर त्यात काही तांत्रिक त्रुटी असल्याचं निदर्शनास येताच कंपनीचे व नॅशनल हायवे अथॉरिटी अमरावती चे उपमहा प्रभांधक यांनी सदर स्लॅब भविष्यात धोका निर्माण होऊ शकते अश्या निर्णय घेत सदर स्लॅब सवता पाडले मात्र ग्रामस्थ मध्य स्लॅब पडल्याची चर्चा होती मात्र स्लॅब मध्ये तांत्रिक त्रुटी आल्याने पाडण्यात आले.
सदर घटने बदल राजपथ इन्फ्र कंपनीचे जनरल व्यवस्थापक रोहिदास पिसल याच्याशी व नॅशनल हायवे अथॉरिटी अमरावती चे उप महा प्रबंधक एस वी ढगे याच्याशी संवाद साधला असता अनभोरा येथील अंडर पास रस्ता असलेल्या पुलावर अर्धा स्लॅब एका बाजूचा सहा महिने पूर्वी पुर्ण झाला होता व रहलेला दुसऱ्या पुलावरील स्लॅब 23सप्टेंबर रोजी टाकण्याचे नियोजन करून त्या नुसार 23रोजी पुलावर स्लॅब टाकण्याचे काम दुपारचा दरम्यान सूरु केले असता जवळ्पास रात्रि 1.30च्या दरम्यान स्लॅब चे काम पुर्ण झाल्यावर फिनिशिंग करताना टाकलेल्या स्लॅब मध्ये वरून दबलेले दिसल्या वरून तज्ञ मंडळीने पाहणी केली असता खाली लावण्यात आलेली सेंट्रिंग दाबल्याने स्लॅब मध्ये त्रुटी अल्याने टाकण्यात आलेला स्लॅब तत्काल पाडण्यात आल्याची महिती दिली
चौकट ====
ग्रामपंचायत अनभोरा येथे राष्ट्रीय राजमार्ग ५३ वर कि.मी .२१२ / २६४ मध्ये अंडरपासचे उजविकडील बांधकाम सहा महिन्यापूर्वी झालेले आहे . शुक्रवार सायंकाळी म्हणजेच दिनांक २३ सप्टेंबर २०२२ ला डावीकडील बांधकाम सुरु होते , छताचे बांधकाम पूर्ण होत असताना असे लक्षात आले कि अकोला बाजूकडील छतामध्ये पातळी फरक आढळल्यामुळे इंजिनियर यांच्या निदर्शनानुसार निर्णय घेण्यात आला कि काँक्रेट फ्रेश असताना सदर छत काढावे लागेल व नवीन छत बांधावे लागेल त्यानुसार छताचे फ्रेश काँक्रेट काढण्यात आले व नियमानुसार कंपनी स्वखर्चाने नवीन छताचे बांधकाम करणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *