लागल्याने या आगीत मोठे नुकसान
आग कशी लागली संशोधनाचा विषय
मूर्तीजापूर
मूर्तीजापूर तालुक्यातील कुरणखेड येथे मालानी जिनिंग फॅक्टरी ला आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे, आज सकाळी नऊच्या सुमारास दिपक मालाणी, धनराज मालाणी, हरीश मालाणी यांच्या मालकीची कुरणखेड येथील असलेल्या जिनिंग फॅक्टरीला आग लागली यामध्ये जिनिंग फॅक्टरी मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठो कुरणखेड येथील श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन आगिला आटोक्यात आणण्याचा शर्तीच्या प्रयत्नाने केला, या वेळी मुर्तीजापुर नगर परिषद अग्निशामक विभागाच्या गाडीला पाचारण केले होते, मालानी जिनिंग फॅक्टरी मध्ये आग नेमकी कशा मुळे लागली याचा तपास पोलीस करीत आहे.
