जिल्ह्यात भिक्षेकरी सर्व्हेक्षणास प्रारंभ

अकोला

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

 अकोला, दि.6 जिल्ह्यात भिक्षेकरींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने भिक्षेकरी व्यक्तिंचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले होते. त्यानुसार महिला व बालविकास विभागाच्या वतीने सोमवार दि.6 ते गुरुवार दि.9 या कालावधीत जिल्ह्यात भिक्षेकरी सर्व्हेक्षण राबविण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,  महिला व बालविकास विभागाच्या वतीने भिक्षेकरी पुर्नवसना बाबत महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कार्यशाळा घेण्यात आली. त्यात कडू यांनी निर्देश दिले की, भिक्षेकरी पुर्नवसनासाठी शासनाचे धोरण व समाजाचे मन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यामुळे भिक्षेकऱ्यांचे पुर्नवसन योग्य प्रकारे होवु शकेल असा विश्वास व्यक्त करुन राज्यात भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार अकोला जिल्ह्यात भिक्षेकरी सर्व्हेक्षण राबविण्याबाबत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे याचे अध्यक्षेतखाली बैठक घेण्यात आली. त्यानुसार तालुकानिहाय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन शहर व रेल्वे, अंगणवाडी सेविका, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांचा सहभाग आहे. या बैठकीस परिविक्षा अधिकारी आशिष वेरूळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर, चाईल्ड लाईन समन्वयिका हर्षाली गजभीये, रेल्वे चाईल्ड लाईन समन्वयक पद्माकर सधांशु, तालुका संरक्षण अधिकारी अतुल चव्हाण, कैलास चंडालीया प्रदिप टांक, निलेश खांडेकर, अश्विन डाबेराव, प्रफुल गावंडे, सुनिल सरकटे, सतिश राठोड, संगिता अभ्यंकर उपस्थित होते. त्यानुसार जिल्ह्यात भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण हे दि.6 ते 9 या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *