ग्रामीण भागातील वीजसमस्येमुळे कृषी पर्यटन, व्यवसायावरही परिणाम ; ग्रामस्थांची तोडगा काढण्याची मागणी

Maharashtra State

बदलापूर : कायमच वीज समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण जनतेला काही वर्षांपूर्वी अखंडीत वीज पुरवठ्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बदलापुरजवळच्या वांगणी, काराव, अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या गंभीर झाली आहे. परिणामी कृषी पर्यटन, महाविद्यालये, व्यवसाय या सर्वांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होते आहे.

मुंबई, उपनगरातील घरे परडवत नसल्याने गेल्या काही वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांकडे चाकरमानी वळला. त्यामुळे या शहरांसह या शहरांच्या ग्रामीण भागातही झपाट्याने नागरीकरण होऊ लागले. बदलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांगणी गावाचे वेगाने नागरीकरण होते आहे. तर उल्हास नदीमुळे या नदीलगत अनेक कृषी पर्यटन, शेत घरे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू झाल्या आहेत. याची एक वेगळी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. सोबतच या परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. उल्हास नदी आणि बारवी नदीच्या प्रवाहामुळे येथे शेतकरीही बारमाही शेती करताना पहायला मिळतात. या भागात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे हा भाग विकसीत वाटू लागला आहे. असे असले तरी येथील महावितरणाचा कारभार या सर्व व्यवस्थेला त्रासदायक ठरू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *