एकनाथ शिंदे राजभवनात कोश्यारींच्या भेटीला, वाचा विधानपरिषदेतील १२ संभाव्य नावांची यादी

Maharashtra State

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते विधान परिषदेच्या १२ आमदारांची नवी यादी राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. १२ आमदारांच्या यादीसंदर्भात ही भेट असल्याची शक्यता आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांची यादी रद्द केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) हे नवी यादी घेऊन राज्यपालांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshyari) नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांची यादी रद्द करा, असं पत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठवलं होतं. त्यानंतर राज्यपालांनीही झटपट निर्णय घेत अखेर पावणेदोन वर्ष रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रस्ताव रद्द केला.हेही वाचा -पावणेदोन वर्ष रखडलेली विधान परिषदेची यादी सात दिवसात रद्द, कोश्यारींचा झटपट निर्णय

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची यादी रद्द करुन नवी यादी सादर करतील याची शक्यता होतीच. त्यासंदर्भात शिंदेंनी पत्र पाठवताच कोश्यारींनीही झटपट निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ नावांची बहुचर्चित यादी मुख्यमंत्री कार्यालयाला परत पाठवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून नव्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा -रखडलेली यादी, पहाटेचा शपथविधी, तीन वर्षांच्या कार्यकाळातील कोश्यारींची वादावादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *