अकोला : दिनांक 11 सप्टेंबर ला विदर्भातील सर्वात मोठी नावलौकिक असलेली शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचे निवडणुका पार पडत आहेत यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत आहे शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्ण विदर्भामध्ये विस्तृत असलेल्या हायस्कूल महाविद्यालय येथील निगडित असलेले संस्थेचे आजीवन सभासद यांची संख्या 800 च्या जवळपास आहे त्याच सभासदांना संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष व प्रगती पॅनलचे सर्वेसर्वा हर्षवर्धन देशमुख यांनी मागील कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या विकासात्मक कार्य संस्थेच्या हिताची केली आहेत त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित सर्व शाळा डिजिटल करणे मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या धरतीवर विकसित करणे संस्थेच्या सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे संस्थेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी भौतिक व शैक्षणिक सुधारणा करणे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयाला सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात खाजगी रुग्णालयापेक्षा कमी दरात रुग्णांसाठी सर्व सुविधायुक्त विशेष आय सी यु वार्ड आणि पेइंग रूमची निर्मिती करणे तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी निवास भवनाचे बांधकाम करणे, भाऊसाहेबांचे जन्मगाव पापड येथे कृषी महाविद्यालयाची शाखा सुरू करणे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय सुरू करणे त्यासोबतच कृषी रत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनीच्या स्मरणार्थ अमरावती येथे भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी चे आयोजन करणे तसेच विदर्भातील शेतकऱ्यांकरिता नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी शेतकरी जागृती अभियान राबवणे राष्ट्रीय स्तरावर भाऊ साहेबांच्या कार्याची दखल व्हावी म्हणून कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी किंवा संशोधकांचा दरवर्षी कृषी रत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देऊन गौरव करणे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावर मान्यवर व त्यांची विशेष व्याख्यान आयोजित करणे असे विशेष कार्य मागील कार्यकारणीत झाले असून विशेष म्हणजे ग्वाल्हेर येथे मराठा संशोधन केंद्र सुरू करणे असे इतर अनेक महत्त्वाचे विषय व उद्देश विद्यमान शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पुंडकर यांनी व्यक्त केले आहे