गावागावात शिक्षक विना शाळा अशी जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती असून सुद्धा आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत आलेले अंदाजे 140 च्या वर शिक्षक जिल्हा परिषदेच्या समुपदेशन आणि पदस्थापनाची ची प्रतीक्षा करीत आहे .
VOICE – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आज आंतर जिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांनी भेट दिली आहे
यावेळी शिक्षकांनी आम्हाला शिकवण्यासाठी शाळा कधी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले आहे .
जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेला शिक्षकांचा अभाव यावर पुढाऱ्यांच्या समस्ये चा मोठा भाग सभेत असतोच पण शिक्षक शिकवायला तयार पण प्रशासनाचा अट्टहास अडथळा बनत असल्याचे दिसून आले आहे .
बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रक्रियेत दिलेल्या शासन निर्णया नुसार जेवढ्या शिक्षक आंतर जिल्हा बदली करून आलेले आहे त्यांना 7 दिवसात समुपदेशन करून पदस्थापणा करणे असे नमूद केले आहे .
पण अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 228 शिक्षक पूर्णतः उपस्थित होत नाही तो पर्यंत समुपदेशन आणि पडस्थापणा प्रक्रिया पार न पाडण्याची भूमिका सादर केली असल्याची चर्चा शिक्षक वर्गात सुरू आहे .
समुपदेशन आणि पद स्थापना करण्याची दिनांक निघून 25 पेक्षा जास्त दिवस उलटले तरी पण आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत असलेली शिक्षक मंडळी शाळेच्या प्रतीक्षेत आहे .
यावेळी बदली प्रक्रियेतील काही शिक्षक मंडळी शिक्षणाधिकारी यांना विचारणा करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाला उपस्थित झाले होते .तसेच त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे प्रस्थाव देण्यात आला आहे असे उत्तर देण्यात आले .