घर सांभाळत महिलांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

अकोला

अध्यक्षा लि.प्रतिभाजी कावेकर यांनी केले कौतुक
लिनेस क्लबची मासिक सभा उत्साहात संपन्न

अकोला :  घर सांभाळून आणि कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी सांभाळात सामाजिक कार्य करणाNया महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार लिनेस क्लबच्या लातूर येथील प्रांताध्यक्ष लि.प्रतिभाजी कावेकर यांनी अकोल्यात काढले. त्यांनी अकोल्यात आयोजित लिनेस क्लबच्या मासिक सभेत उपस्थित लिनेस क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची व कार्याची यावेळी दखल घेत कौतुक केले.
नुकतीच अकोला येथील लिनेस क्लबची मासिक सभा स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे अध्यक्ष व क्षेत्रीय समन्वयक यांची  अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लातूर येथील प्रांताध्यक्षा लि प्रतिभाजी कावेकर यांच्यासह प्रांत सचिव लि. अर्चनाजी नलावडे, लि.चे प्रांतीय  कोषाध्यक्ष लि साधनाजी पळसकर, प्रांत कार्य अधिकारी लि. उमाजी मिरजगवे यांच्यासह वाशिम येथील प्रादेशिक संयोजिका  लि. ज्योतीजी चरखा व वाशिम क्लबचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा लि सुलेखा गुप्ता, सर्व मान्यवर  प्रांतिक गतिविधी अधिकारी लि उमाजी मिरजगावे, सह. प्रांतीय कोषाध्यक्ष लि.साधनाजी पळसकर,  नवनिवृत्त प्रांताध्यक्ष लि.सुनंदाजी गुप्ता, लि.चे माजी प्रांताध्यक्षा लि.आशाजी विरवाणी, लि.डॉ.ताराजी माहेश्वरी आणि लि.उषाजी बाहेती प्रांत सचिव अर्चनाजी नलावडे क्षेत्रीय संयोजिका लि ज्योतीजी चरखा व प्रांताध्यक्षा लि प्रतिभाजी पाटिल कवेकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षांनी सभा सुरू झाल्याची घोषणा केल्यानंतर अरुंधती शिरसाठ यांनी ध्वज वंदना  केली. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  अध्यक्षांच्या नातवंड श्रेया गुप्ता आणि अनिशा गुप्ता यांनी सुंदर गणेश वंदना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. ली चंदा जायसवाल यांनी सुमधूर वाणीत स्वागत गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
सभेला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर व अधिकारी यांचा पुष्पगुच्छ, रोपटे, शाल श्रीफळ, मोमेन्चो देऊन सत्कार करण्यात आला. आरआरसीच्या उपस्थित टीमचे  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . अध्यक्षांनी स्वागतपर भाषण केले.सचिव लि नम्रता अग्रवाल यांनी सचिवांच्या अहवालात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती दिली आणि सप्टेंबर महिन्यात हाती घेण्यात येणाNया प्रकल्पांची माहिती दिली. प्रांत सचिवांनी मनोगत व्यक्त केले. लि. स्वाती झुनझुनवाला यांनी प्रादेशिक संयोजिकांचा  परिचय करून दिला. त्यानंतर प्रादेशिक संयोजिका  लि.ज्योतीजी चरखा यांचे भाषण झाले ज्यात त्यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक केले. लि.रत्नमाला रुईकर यांनी अध्यक्ष, लि.प्रतिभाजी पाटील कावेकर यांचा परिचय करून दिला.   अध्यक्षांनी आपल्या भाषणात लिनेस क्लबने सुरू केलेल्या प्रकल्पांची प्रशंसा करून, ‘अपने हाथ सेवा के साथ ‘ हे घोषवाक्य घेण्यामागील त्यांचा उद्देश सांगितला. महिलांवर किती जबाबदाNया आहेत हे त्यांना चांगलेच माहीत असून त्या जबाबदाNया पार पाडत असताना घराबाहेर पडून सेवा कार्यासाठी वेळ देणे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यानंतर क्लबच्या सदस्यांनी काही प्रकल्प घेतले. ज्यामध्ये सर्वप्रथम लि. इंदू तिवारी यांच्या हस्ते दोन कर्णबधिर मुलांना इअरफोनचे सेल देण्यात आला. लि.च्या अध्यक्षा सुलेखा गुप्ता आणि सचिव लि. नम्रता अग्रवाल यांनी दहा महिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे किट दिले. ली पूनम तिडके यांनी दहा कर्णबधिर मुले व त्यांच्या मातांना वाचन साहित्य दिले. यासोबतच क्लबच्या सदस्यांनी नेत्रदानाचे अर्ज भरले. माजी प्रांताध्यक्षा लि. डॉ.ताराजी माहेश्वरी यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात आले.
सभेच्या आयोजक लि. कल्पनाजी  देशमुख, लि. राजश्री देशमुख, लि. दिव्या देशमुख, लि. अरुंधती शिरसाट, लि. रत्नमाला रुईकर आणि लि. अर्चना डेहनकर यांनी पुष्प देऊन आभार मानले. लि. राजश्री देशमुख यांना त्यांचा उत्कृष्ट सूत्रसंचालन करिता भेट वस्तु देत गौरविण्यात आले.  सभेच्या आयोजकांकडून विविध खेळ यावेळी आयोजित केले होते. या खेळातील विजेत्या सदस्यांना बक्षिसे देण्यात आली.  लि.दिना शाह आणि लि. स्वाती झुनझुनवाला यांना सर्वोत्कृष्ट ड्रेस कोडचा पुरस्कार देण्यात आला. लि. कल्पनाजी  देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. या बैठकीला प्रमुख पाहुणे, माजी प्रांताध्यक्षा, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांच्यासह क्लबचे सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *