
– त्र्यंबक सिरसाट बाळापूर येथील रिपाई ( आठवले ) पक्षाची आढावा सभा संपन्न
बाळापूर : ना. रामदास आठवले केंद्रीय मंत्री, नवी दिल्ली यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची घोडदौड सुरू असुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन रिपाई पक्षाच्या बाळापूर येथील आढावा सभेत अध्यक्षपदावरून बोलताना अकोला जिल्हाध्यक्ष त्र्यंबक सिरसाट यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाळापूर तालुका पक्षाची आढावा सभा शनिवार नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली यावेळी सभेचे अध्यक्षपदी रिपाईचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक शिरसाट होते.
प्रारंभी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणुन राज्य कार्यकारणी सदस्य सुधीर रोकडे, जिल्हा महासचिव जे.पी. सावंग, अकोला युवा आघाडीचे बुध्दभुषन गोपनारायण, अजय गवई, रिपाई नेते विलास अवधार आदी रिपाईचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित असून उपस्थितांना मागदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना त्र्यंबक सिरसाट यांनी सांगितले की, ई – क्लास जमीन, रमाई घरकुल योजना, तसेच रिपाई पक्षाच्या सदस्य नोंदणी विषयावर त्यांनी मार्गदर्शन करून पदाधिकारी व कार्यकत्यांना भविष्यात सक्रिय रहावे लागेल तसेच सर्वसामान्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपला पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहुन त्यांना न्याय मिळवून देईल असे प्रतिपादन केले. सदर आढावा सभेस बशीर पैलवान, रवि जंजाळ किशोर, निळकंठ दशरथ अवचार, शेख सलीम, शालीग्राम नाईक, नारायण बोरकर, सचिन तायडे, अजय तायडे, सय्यद रहेमान, अन्सार भाई, विराम पहेलवान, जगदेव हिवराळे, बन्सीधर तायडे, सुधाकर बोबडे, अशोक वाकोडे, मंदा तायडे, शिला तायडे, सखुबाई उपट, माया तायडे, वनिता तायडे, मनोहर साठे, सचिन वानखडे, पुंडलिक डोंगरे इत्यादी रिपाईच्या कार्यकत्यांनी सभेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले तसेच प्रास्ताविक नारायण बोरकर यांनी,