अकोला : शासकीय लेखापरीक्षक सहकारी संस्था (ग्राहक) चे लेखापरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक तायडे यांचे वर खोट्या तक्रारीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्हया बाबत आज महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह डिपार्टमेंट ऑडिटर्स असोसिएशन नागपूर शाखा अकोला च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले
विनायक रामदास तायडे हे लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत, शासनाच्या वतीने त्यांनी अकोला मनपा शिक्षक समृद्धी शिक्षण संस्थेवर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला होता,
त्या फौजदारी गुन्ह्या मधील मुख्य आरोपी हा तुरुंगात होता, त्या पश्चात सदर आरोपी हा तुरुंगातुन सुटल्यावर त्यांनी काही लोकांच्या माध्यमातून तायडे यांच्या बाबत खोट्या तक्रारी दिल्या होत्या, त्या खोट्या तक्रारी वर सहानुभूती ने विचार करीत खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणी साठी आज महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह डिपार्टमेंट ऑडिटर्स असोसिएशन नागपूर शाखा अकोला च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.