अकोल्यात आज किती कोरोना रुग्ण ?

अकोला ब्रेकिंग

कोविडःआरटीपीसीआर ‘दोन’ पॉझिटीव्ह

अकोला दि.8 जुन

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 139 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी शून्य) दोन  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 02.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते रेल ता.अकोट व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘दोन’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65183(49171+15038+974)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *