ममता बॅनर्जी यांनी २२ पक्षांना बोलावले

Uncategorized

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. तथापि, विरोधी पक्षाकडून संयुक्त उमेदवार देण्याचे ठरले. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह १८ पक्ष सहभागी झाले. बैठकीवेळी ममता यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली, पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर ममता यांनी प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचेमाजी सीएम फारूक अब्दुल्ला यांचे नाव सुचवले. त्यावर बैठकीला हजर असलेल्या पक्षांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच यावर निणNय घ्या, असे सांगितले. गांधी २०१७ मध्ये युपीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. ते एनडीएच्या वेंकय्या नायडूंकडून पराभूत झाले होते. तथापि, शरद पवार पुढच्या आठवड्यात मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावू शकतात. बैठकीला टीआरएस, आप, बीजद, अकाली दल आणि टीडीपीकडून कोणीच आले नाही. टीआरएस म्हणाला, आम्ही काँग्रेससोबत मंचावर बसू शकत नाही. तर उमेदवार निश्चित झाल्यानंतरच आम्ही विचार करू, असे आपने सांगितले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, आम्हाला निमंत्रण नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *