मुंबई,
रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचा दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिथे रॉकेल मिळत नाही तिथे थेट डिझेल चा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गरिबांची चूल पेटवणारे रॉकेल चांगलेच महाग झाले आहे. रेशन दुकानांमध्ये एका लिटरसाठी ९८.५० रुपये लाभाथ्र्यांना मोजावे लागत आहेत. गेल्या महिन्यात हेच निळे रॉकेल लिटरला ८५ रुपयांना विकले जात होते. आता तब्बल सुमारे १४ रुपयांनी ते महाग झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचा झटका सरकारने दिला आहे.
