गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट; एसआयटीची माहिती

देश – विदेश

अहमदाबाद : सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला, अशी माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला दिली. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.
एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले; यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. एसआयटी अधिका?्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार तथा काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधीपक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिका?्यांसह निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *