केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला. या आरोपानंतर आता स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेष, नीता डिसुजा यांच्यासह काँग्रेसला नोटीस बजावली आहे. माझ्या मुलीविरोधात खोटा आरोप केला जात असून लिखित स्वरुपात माफी मागावी. तसेच सर्व आरोप परत घ्यावेत, अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.“आपण सर्वांकडून आमच्या अशिलाची तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेची बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरु करण्यासाठी तसेच कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाकडूनही इराणी यांच्या मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही,” असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.